RCB vs SRH IPL 2026 : विराट-ट्रॅव्हिस हेडमध्ये वाद? सामना संपल्यानंतर वाढला तणाव, विराटने हस्तांदोलन टाळले

Virat Kohli : आयपीएल २०२६ मध्ये काल २२ मे रोजी आरसीबी विरुद्ध हैदरबादमध्ये राजीव गांधी स्टेडियमवर रोमांचक सामना झाला .हा सामना केवळ हैदराबादच्या दमदार विजयामुळेच नाही, तर विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात मैदानात झालेल्या वादामुळेही चर्चेत आला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने आसीबीवर वर 55 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र सामन्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली ती विराट आणि हेड यांच्यातील तणावाची. सामना संपल्यनंतर विराटने हस्तांदोलन टाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात आरसीबीला २० षटकांत २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. पराभव होऊनही नेट रनरेटच्या जोरावर आरसीबीने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले . दरम्यान, सामन्यादरम्यान विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले . दोघांच्या चेहऱ्यावर आक्रमक हावभाव स्पष्ट दिसत होते. मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सामना संपल्यावरही हा तणाव कायम असल्याची चर्चा सुरू झाली. सामना झाल्यानंतर विराट कोहलीने हेडशी हस्तांदोलन करणे टाळले. सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रॅव्हिस हेड विराट कोहलीकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे करताना दिसतो. मात्र विराटने त्याकडे लक्षच दिले नाही. यावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. काही चाहत्यांनी हा फक्त गैरसमज असल्याचं म्हटलं, तर काहींनी विराटने जाणीवपूर्वक हेडला इग्नोर केल्याचा दावा केला.



नेमकं प्रकरण काय ?


ही घटना आरसीबीच्या फलंदाजीच्या वेळी घडली. त्यावेळी हैदराबादकडून शिवांग कुमार गोलंदाजी करत होता तर अय्यर त्याच्या चेंडुंवर चांगली फलंदाजी करत होता. मात्र दुसरीकडे विराट मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या हेडकडे वारंवार बोट दाखवत होता. त्यावेळी तो बराच आक्रमक दिसत होता. कोहली त्याच्या कडे पाहून काही तरी म्हणाला, त्याच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या समालोचकांनी सांगितले की , कोहली हेडला म्हणाला, दम असेल तर मला तुझी ऑफ-स्पिन दाखव. मात्र हेडने यावर काही प्रतिक्रिया दिली नाही तो फक्त हसत होता. सामना संपल्यानंतर हा वाद शिगेला गेला, हस्तादोंसनच्या वेळी हेडने विराटकडे हाथ पुढ केला, पण विराटने त्याला पूर्णपणे इग्नोर केले.दोन्ही खेळाडू मैदानावरील आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्स, प्रतिक्रिया आणि चर्चांना पूर आला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये आता या व्हायरल क्षणाचीच सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून