पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखाजोखा या विशेषांकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून, यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.