नवी मुंबईतील एनआरआय वेटलँडमध्ये फ्लेमिंगो संरक्षणासाठी इशारा फलक, पर्यटकांसाठी कडक नियम लागू

नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय वेटलँड परिसरात फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने विशेष पावले उचलली आहेत. फ्लेमिंगो पाहण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने या संवेदनशील परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी परिसरात इशारा फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी ‘करावे आणि करू नयेत’ अशा सूचनांची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. ड्रोन उडवणे, तलावात प्रवेश करणे, पक्षांना खाद्य देणे, मोठा आवाज करणे, कचरा टाकणे, शिकार करणे आणि आग लावणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ आणि ५१ अंतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

स्थानिक पक्षीप्रेमींनी सांगितले की, हा परिसर ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला असून, मागील काही वर्षांत काही जणांनी फ्लेमिंगोंच्या थव्यांवर ड्रोन उडवल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पक्ष्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. यंदा डीपीएस आणि टीएस चाणक्य वेटलँडमध्ये फ्लेमिंगोंचे प्रमाण कमी असल्याने सीवूड्समधील एनआरआय वेटलँडकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दररोज सुमारे ५०० पर्यटक येथे फ्लेमिंगो पाहण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

पर्यावरण कार्यकर्ते आणि एनआरआय कॉम्प्लेक्सचे रहिवासी सुनील अग्रवाल यांनी वन विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. किनारी वेटलँड्स हे मॅन्ग्रोव्ह परिसंस्थेचाच विस्तार असल्याची भूमिका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतल्यानंतर वेटलँड संवर्धनाकडे प्रशासन अधिक गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक वेटलँड्सवर वाढत्या बांधकामांचा दबाव असल्याने या जैवविविधतेच्या अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत