Bollywood News : आलिया, शिल्पा, माधुरीला मागे टाकत 'ही' विदेशी अभिनेत्री ठरली युट्यूबवर नंबर १ !

सध्याच्या डिजिटल युगात बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ पडद्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारे हे स्टार्स आता लाँग व्हिडिओ आणि व्लॉगिंगसाठी यूट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, यूट्यूबवर सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणाऱ्या टॉप ७ सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. यामध्ये एका विदेशी अभिनेत्रीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यात तिने आलिया पासून अगदी माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनाच मागे टाकले आहे.



बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही हिने आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत, यूट्यूबवर पहिले स्थान मिळवले आहे. नोराच्या यूट्यूब चॅनेलवर ४५ लाख म्हणजेच ४.५ मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक सब्सक्रायबर्स मिळालेली ती पहिली अभिनेत्री ठरली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर योगा क्वीन शिल्पा शेट्टी कुंद्रा आहे. तिचे ३८ लाख सब्सक्रायबर्स आहेत. तर तरुणांची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट २६ लाख सब्सक्रायबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर क्रिती सेनॉन आहे. तिचे जवळपास १३.३ लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर पाचव्या क्रमांकावर धकधक गर्ल म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आहेत. तिचे जवळपास १३.१ लाख सब्सक्रायबर्स आहेत.



विशेष म्हणजे, या संपूर्ण यादीत कार्तिक आर्यन हा एकमेव पुरुष अभिनेता आहे. त्याचे ८.३ लाख सब्सक्रायबर्स आहे. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ८.२६ लाख सब्सक्रायबर्ससह सातव्या स्थानावर आहे. सेलिब्रेटींचा नवा अड्डा म्हणून यूट्यूबकडे पाहिले जाते. बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता हे स्टार्स स्वतः व्लॉग आणि पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या थेट संपर्कात येत आहेत. यूट्यूबवर सध्या बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सच्या बाता आहे. पण या मध्ये कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेहीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तिने तिच्या यूट्यूब सब्सक्रायबर्सच्या माध्यमातून बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकले आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’