KKR vs DC : आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने, केकेआरकडे प्लेऑफमध्ये जाण्याची शेवटची संधी

IPL 2026 : आयपीएल 2026 मधील लीग टप्प्यातील अखेरचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे. हा सामना केकेआरसाठी डू ओर डाय असणार आहे.संघाला कोणत्याही परिस्थितीत या सामन्यात जिंकावे लागेल.


अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता सध्या 13 सामन्यांत 13 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाबच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफचे स्वप्न आधीच संपुष्टात आले आहे. दिल्ली सध्या 12 गुणांसह आठव्या स्थानी आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा सामना प्रतिष्ठेचा तर कोलकातासाठी अस्तित्वाचा ठरणार आहे. यात केकेआरला मोठा धक्का बसला आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज दुखपतीमुळे सामन्यातून बाहेर झाला आहे.


केकेआला मोठा धक्का


अंगकरीक्ष रघुवंशी केकेआरसाठी या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज. दिल्ली विरुद्धच्या निर्णायक सामन्यापसून तो धूर झाला आहे. रघुवंशीला मागच्या सामन्यात हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या समन्यात खेळणार नाही आहे. त्याने या हंगामात 422 धावा केल्या आहेत. आता फिन ॲलनवर मोठी जबाबदारी असणार आहे. ॲलनने 10 सामन्यात 329 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत कार्तिक त्यागीने उत्तम कामगिरी केली आहे.


दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी यंदा पूर्णपणे केएल राहुलवर अवलंबून राहिली आहे . राहुलने 13 सामन्यात 533 धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत . त्याने एक शतक आणि चार अर्धशतकही झळकावले आहेत. गोलंदाजीत कर्णधार अक्षर पटेलने १३ सामन्यात सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या आहेत.


हेड टू हेडमध्ये


आयपीएल इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 35 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाताने 20 सामने जिंकले आहेत, तर दिल्लीला 14 वेळा विजय मिळाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आकडेवारीतही केकेआरचं वर्चस्व दिसून येत आहे.


पिच रिपोर्ट


ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. छोट्या बाउंड्री आणि वेगवान आउटफिल्डमुळे येथे मोठ्या धावसंख्या पाहायला मिळतात. दवाचा परिणाम महत्त्वाचा ठरू शकतो, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.



संभाव्य प्लेइंग-11


कोलकाता नाईट रायडर्स :


अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, मनीष पांडे, कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया, अनुकूल रॉय, सुनील नरेन, कार्तिक त्यागी, सौरभ दुबे.


दिल्ली कॅपिटल्स :


अभिषेक पोरेल, केएल राहुल, साहिल परख, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी, त्रिपुराणा विजय.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त