Praggnanandhaa Rameshbabu : प्रज्ञानंदची सुवर्णसंधी हुकली

६ तासांच्या महासंग्रामानंतर सामना बरोबरीत


बुखारेस्ट : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह विरुद्ध विजयाची सुवर्णसंधी साधता आली नाही. अनेक आक्रमक डावपेचानंतरही अखेरची लढत १३९ चालींनंतर बरोबरीत सुटली. त्यामुळे सुपर चेस क्लासिक स्पर्धेतील जेतेपदाची शर्यत अधिक रंगतदार बनली आहे.


स्पर्धेच्या उपांत्य फेरीअखेर अमेरिकेचा फॅबियानो कारुआना आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत रंगत वाढवली.



प्रज्ञानानंदाने ग्रुनफेल्ड डिफेन्समध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत फ्रेंच प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला होता. काळ्या मोहऱ्यांच्या विस्कळीत प्याद्यांच्या रचनेमुळे भारतीय खेळाडू वरचढ स्थितीत दिसत होता. मात्र काही अनपेक्षित चुका झाल्याने सामना राणी आणि प्याद्यांच्या एंडगेमपर्यंत पोहोचला.


प्रज्ञानानंदाकडे अतिरिक्त प्याद्याचा फायदा असतानाही सामना सतत चढ-उतार अनुभवत राहिला. वेळेच्या प्रचंड दबावातही त्याने अखेरपर्यंत झुंज दिली. तब्बल १३९ चालीनंतर स्पर्धेतील सर्वात प्रदीर्घ सामना अनिर्णित राहिला.


दुसरीकडे सिंदारोव्हने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हान फोरेस्टवर शानदार मात करत आपला विजयी फॉर्म कायम ठेवला. रूक आणि नाईटच्या अचूक संयोजनातून त्याने अप्रतिम चेकमेट साधले.



दरम्यान, रोमानियाच्या बोगदान-डॅनियल डॅक याने नेदरलँड्सच्या अर्निश गिरीला धक्का दिला. अमेरिकेच्या वेस्ली सो याला फ्रान्सच्या अलिरेझा फिरौझाच्या माघारीमुळे वॉकओव्हर मिळाला.


अंतिम फेरीपूर्वी आता पाच खेळाडू जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. कारुआना आणि कीमर ५ गुणांसह आघाडीवर असून सिंदारोव्ह, वेस्ली सो आणि व्हॅन फॉरेस्ट ४.५ गुणांसह त्यांच्या मागावर आहेत. प्रज्ञानानंदा ४ गुणांसह संयुक्त सहाव्या
स्थानावर आहे.


स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ३ लाख ७५ हजार अमेरिकी डॉलर्स इतकी असून विजेत्यासाठी १ लाख डॉलर्स राखीव आहेत. मात्र प्रज्ञानंदचा हा सामना ड्रॉ झाल्यामुळे इतर खेळाडूंना आघाडी घेण्याची संधी मिळाली असून, आता स्पर्धा 'करो या मरो' अशा रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. तसेच गुणसंख्या समान राहिल्यास जलदगती टायब्रेकर सामने खेळवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात