RCC Classes Shivraj Motegaonkar : NEET वादात आता मीम्सचा पूर; मोटेगावकरांच्या ‘पाणी थेरपी’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

“अरे मोटेगावकरांकडे बघा… विद्यार्थी पास व्हावेत म्हणून थेट अंगावर पाणीच टाकतायत,” अशा आशयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात चर्चेत आलेल्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावर आता मीम्स आणि ट्रोल्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना ‘१०१ प्रश्न’ दिले आणि त्यातीलच प्रश्न परीक्षेत आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोटेगावकर यांच्याभोवती टीकेची मालिका सुरू झाली आहे.



नेटिझन्सनी या प्रकरणाला वेगळंच वळण देत अनेक फनी पोस्ट तयार केल्या आहेत. “पास होण्यासाठी अभ्यास नको, मोटेगावकरांचे पाणी पुरे,” अशा भन्नाट कॅप्शनसह मीम्स व्हायरल होत आहेत. काही जणांनी तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पाणी ओततानाचे एडिटेड फोटो शेअर करत “ही आहे १००% रिजल्टची गॅरंटी” असा टोला लगावला आहे.



दरम्यान, परीक्षांच्या काळात सोशल मीडियावर मीम्स आणि विनोद व्हायरल होण्याची परंपरा नवीन नाही. याआधीही CBSE बोर्ड परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी मीम्सचा वापर करण्यात आला होता.


मोटेगावकर प्रकरणानंतर मात्र विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वत्र संताप आणि चर्चेचे वातावरण आहे. CBI कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर मात्र लोकांनी या गंभीर प्रकरणालाही विनोदाचा तडका देत भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.




Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी