IPL मध्ये लाजिरवाणी घटना! चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार ; मैदानातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी थेट चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठा उत्साह दिसून येत होता. अशातच काही अतिउत्साही प्रेक्षकांकडून हा दुर्व्यवहार करण्यात आला.


सध्या याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलिस तात्काळ हस्तक्षेप करताना दिसत आहेत. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित चाहत्यांना कडक शब्दांत सुनावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेनंतर आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चाहत्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.





नेमकं काय घडलं?


शनिवारी (२३ मे) रात्री झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना, प्रेक्षक गॅलरीतील काही अतिउत्साही आणि मद्यधुंद चाहत्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला चिअरलिडर्ससोबत अश्लील कृत्य केले. काहीनीं तर चक्क त्यांच्या अंगावर ड्रिंककैन फेकल्याचे आरोप होत आहे. पोलीसांनी संबंधित चाहत्यांवर कारवाई केली आहे.दरम्यान, सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊचा ७ विकेट्सनी पराभव करत प्लेऑफच्या आश्या कायम ठेवल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावत संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. त्याने ५१ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. या विजयामुळे पंजाबचे १५ गुण झाले असले तरी प्लेऑफचे तिकीट अजून निश्चित झालेले नाही. आता त्यांचे भाग्य मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यांच्या निकालावर अवलंबून आहे.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम