Buldhana : हृदयद्रावक ! 4 मुलांना विहिरीत ढकलून वडिलांनीही जीवनयात्रा संपवली, नेमकं काय घडलं ?

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजुरा येथील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय मुसा किराडिया असे या वडिलांचे नाव असून एवढा मोठा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीला माहेरी सोडलं आणि त्यानंतर ४ मुलांसह स्वतःची जीवनयात्रा संपवली.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय किराडिया यांच्या पत्नी काल घरगुती वादानंतर माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर गावाकडे परतताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी घरात काम करत असताना त्यांच्या वडिलांनी पत्नीबद्दल विचारणा केली होती. त्यातून पुन्हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.



यानंतर विजय किराडिया आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण परिसरात गेले. तेथे त्यांनी मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया यांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत जीवन संपवलं.


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. घरगुती कलह आणि मानसिक तणावातून ही घटना घडल्याची शक्यता तपासली जात आहे. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट