FIFA WORLD CUP 2026 : जर्मनीचा फिफा विश्वचषक जिंकण्याचा निर्धार

बर्लिन (वृत्तसंस्था):
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या जर्मनीसमोर आता पुन्हा एकदा जगज्जेतेपद पटकावण्याचे मोठे आव्हान आहे. २०१४ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर रशिया २०१८ आणि कतार २०२२ स्पर्धांमध्ये गट फेरीतच बाहेर पडलेल्या जर्मनीला नवसंजीवनी देण्याचा निर्धार प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांनी केला आहे.



“लक्ष्य फक्त विश्वचषक जिंकणे,” असे नागेल्समन अनेकदा स्पष्टपणे सांगत आहेत. २०२६ च्या विश्वचषकात जर्मनीचा समावेश ‘ई’ गटात करण्यात आला असून त्यांच्यासोबत कुरासाओ, इक्वाडोर आणि आयव्हरी कोस्ट हे संघ आहेत. तुलनेने सोपा गट मिळाल्याने जर्मनीला पुढील फेरी गाठण्यात अडचण येणार नसल्याचे मानले जात आहे.
यंदाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा ठरणार असून तब्बल ४८ संघ १२ गटांत विभागले गेले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांसह सर्वोत्तम आठ तृतीय क्रमांकाचे संघ पुढील फेरीत प्रवेश मिळवणार आहेत.



जर्मनीच्या संघनिवडीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे ४० वर्षीय गोलरक्षक मॅन्युएल नोयर याचे पुनरागमन. बायर्न म्युनिकचा अनुभवी गोलरक्षक आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेत पाचव्यांदा विश्वचषक खेळणार आहे. युरो २०२४ नंतर प्रथमच तो राष्ट्रीय संघाकडून खेळणार असून १४ जून रोजी ह्यूस्टन येथील एनआरजी स्टेडियमवर कुरासाओविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तोच गोलपोस्ट सांभाळणार असल्याचे संकेत आहेत. यानंतर २० जूनला टोरोंटो येथील बीएमओ मैदानावर आयव्हरी कोस्टविरुद्ध सामना होणार आहे. गटातील अखेरचा सामना २५ जूनला न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर इक्वाडोरविरुद्ध खेळवला जाणार आहे. जर्मनी सध्या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार मानला जात नसला तरी या संघाचा इतिहास, परंपरा आणि मोठ्या स्पर्धांमधील अनुभव लक्षात घेता ते पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरण्याची क्षमता राखून आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून