FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात 'माद्रिद'चा विजयी

डॅनी कार्व्हाजालला भावनिक निरोप 


माद्रिद (वृत्तसंस्था) :
स्पॅनिश ला लिगा फुटबॉल लीगच्या यंदाच्या हंगामाचा शेवट कमालीचा थरारक आणि नाट्यमय ठरला. अंतिम फेरीच्या सामन्यात रिअल माद्रिदने अॅथलेटिक बिलाबाओचा ४-२ असा धुव्वा उडवत हंगामाचा शेवट विजयाने केला.



रिअल माद्रिदचा दिग्गज बचावपटू डॅनी कार्व्हाजाल आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने दिलेल्या अप्रतिम पासवर गोंझालो गार्सियाने पहिला गोल केला. यानंतर इंग्लंडचा स्टार ज्युड बेलिंगहॅमने संघाची आघाडी मजबूत केली. हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने दूरवरून एक अचूक आणि वेगवान फटका मारत हंगामातील आपला २५ वा गोल नोंदवला, तर इब्राहिम डियाझने चौथा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्व्हाजाल जेव्हा मैदानाबाहेर जात होता, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी 'गार्ड ऑफ ऑनर' देत त्याला मानवंदना दिली. या अखेरच्या फेरीत गुणतालिकेच्या तळाशी असलेल्या संघांमध्ये 'रेलिगेशन' (अवनती) टाळण्यासाठी जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळाली. मॅलोर्काने आपला सामना जिंकूनही गोलफरकामुळे त्यांना दुसऱ्या विभागात जाण्यापासून स्वतःला वाचवता आले नाही. तर गेल्या वर्षी थेट युरोपियन चॅम्पियन्स लीग खेळणाऱ्या गिरोनाचा संघ यंदा ढिसाळ कामगिरीमुळे थेट दुसऱ्या विभागात घसरला, जो या हंगामातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.



दुसरीकडे, बार्सिलोना क्लबकडून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या पोलंडच्या दिग्गज स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोवस्कीने गोल झळकावून संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, व्हॅलेन्सियाने जबरदस्त पुनरागमन करत बार्सिलोनाचा ३-१ असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये, सेल्टा विगोने आगामी हंगामातील 'युएफा युरोपा लीग'साठी पात्रता निश्चित केली.


Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून