Modi : 'पंतप्रधान मोदींचे काम पुस्तकात मांडणे कठीण'

मोदींनी १२ वर्षांत भारताला आत्मनिर्भर बनवले


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेले अभूतपूर्व परिवर्तन आणि देशाची झालेली प्रगती इतकी अथांग आहे की, हे सर्व कार्य केवळ एका पुस्तकात किंवा भाषणात मांडणे अशक्य आहे. मोदींनी भारताला स्वाभिमानी आणि 'आत्मनिर्भर भारत' म्हणून जागतिक पातळीवर उभे केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत ‘राष्ट्रनिर्माणाची तप:पूर्ती’ या विशेष संग्राह्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विकासाचा आलेख मांडत आधीच्या यूपीए सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत सर्वात महत्त्वाची वाटचाल सामाजिक क्षेत्रात केली आहे. गरिबांना घरगुती गॅस, हक्काची घरे आणि शौचालये उपलब्ध करून देत मोदीजींनी नेहमीच गरीब केंद्रित अजेंडा राबवला. याच धोरणामुळे अवघ्या १० वर्षांत भारताने तब्बल २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले आहे. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले आणि हे आज संपूर्ण जगानेही मान्य केले आहे."



भारताने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी मांडली. "२०१३ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता. आज तो तब्बल ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या दहा-बारा वर्षांत देशाचा जीडीपी तीन पटीने वाढला आहे. मोदीजींनी रचलेल्या या भक्कम पायामुळेच भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने पुढे जात आहे," असे फडणवीस म्हणाले.

यूपीएच्या काळात 'अनुदानप्रणित' अर्थव्यवस्था


"आधीच्या यूपीए सरकारच्या काळात केवळ अनुदानावर लोकांनी जगले पाहिजे, असे धोरण होते. आम्ही नव्या संधी निर्माण करणार नाही आणि पायाभूत सुविधांवर खर्च करणार नाही, अशीच त्या वेळच्या राज्यकर्त्यांची मानसिकता होती. या अनुदानप्रणित अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आणि विकास खुंटला. याउलट मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकास करत देशात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण केल्या," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर