IPL 2026 K. L. Rahul : ईडन मैदानावर के.एल राहुल बरसला!

कोलकाता (वृत्तसंस्था) :
आयपीएल २०२६ मधील ७० व्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रणकंदन पाहायला मिळला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना के.एल राहुलच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ५ बाद २०३ धावांचा डोंगर उभा केला. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकातानेही जशास तसे उत्तर दिले असून कर्णधार अजिंक्य रहाणेच्या झंझावाती फलंदाजीमुळे सामन्यातील थरार कमालीचा वाढला होता.



नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात मध्यम झाली. अभिषेक पोरेल २२ धावांवर बाद झाल्यानंतर स्टार फलंदाज केएल राहुलने मैदानाचा ताबा घेतला. राहुलने अवघ्या ३० चेंडूंत ४ चौकार आणि ५ लाजवाब षटकार खेचत ६० धावांची धडाकेबाज खेळी केली. मधल्या फळीत साहिल पारखने २४, तर कर्णधार अक्षर पटेलने २५ चेंडूंत ३९ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलरने २८ (१९ चेंडू) आणि आशुतोष शर्माने ११ चेंडूंत नाबाद १८ धावा कुटल्यामुळे दिल्लीला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. कोलकाताकडून सौरव दुबेने सर्वाधिक २ बळी घेतले, तर सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 'पॉवरप्ले'मध्ये तुफानी फलंदाजी केली. सलामीवीर फिन ॲलनने १३ चेंडूंत २० धावा केल्या, तर मनीष पांडेने १६ चेंडूंत २५ धावांची वेगवान खेळी केली. दिल्लीच्या लुंगी एन्गिडीने या दोन्ही फलंदाजांना बाद करत कोलकाताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानाचा ताबा मिळवला असून त्याने अवघ्या २२ चेंडूंत ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा कुटल्या. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने ८.४ षटकांत २ बाद ८८ धावा केल्या होत्या. सध्या कॅमेरॉन ग्रीन (१) आणि अजिंक्य रहाणे (४०) क्रीजवर असून कोलकाताला विजयासाठी ६८ चेंडूंत ११६ धावांची गरज होती. त्यांचा धाववेग पाहता कोलकाताचे पारडे ५७% जड वाटत असले, तरी दिल्लीचे फिरकीपटू सामन्याचा पासा कधीही पलटवू याची शक्यता होती.


Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून