Nashik TCS Case : ‘हानिया कौन...’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई...; निदा खानचे महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती

Nashik TCS Case : TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानची महत्त्वाची चॅटिंग पोलिसांच्या हाती लागली आहे. ‘आज हानिया के साथ बाहर जा रहीं हूँ...’, ‘हानिया कौन हैं...’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई...’ या स्वरुपाचे ‘चॅटिंग’ संशयित निदा एजाज खान हिने तिच्या नातलगासोबत केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या तपासात स्पष्ट झाली असून, त्यातून महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत.



निदाचे ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती


दरम्यान, निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २५) नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार असून, धर्मांतराच्या खटल्यातील पहिली सुनावणीदेखील पार पडणार आहे. संशयितांच्या कटानुसार पीडितेचे वर्तन सुरू झाल्यानंतर पीडितेचे नाव ‘हानिया’ ठेवण्यात आले होते. पीडितेचे मूळ नाव हे तिच्या धर्मानुसार महत्त्वाचे होते. त्यामुळेही नामकरणाचा डाव संशयितांनी आखला होता. त्यावरून निदाचे तिच्या पतीसमवेत झालेले ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती लागले आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘एसआयटी’ नियुक्त करून सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली आहेत.



मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर


दरम्यान, निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात मतीन पटेल आज दाखल झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान अनेक दिवसांपासून फरार होती. अनेक दिवस ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यत पोहोचल्याचे समोर आले. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे.


निदा खानला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, आज सोमवारी ( २५ मे) पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर हजर झाला.


दरम्यान TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २५) नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार असून, धर्मांतराच्या खटल्यातील पहिली सुनावणीदेखील पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे नाशिकरांचे लक्ष लागले आहे.



संशयित आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’


तर दुसरीकडे इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. निदा खान आणि इतर संशयितांच्या बचावासाठी या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानसह इतर ६ आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘भोंदू अशोक खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले असून, टीसीएस (TCS) प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते हे पाहून महत्त्वाचं असणार आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण