Amruta khanvilkar : कलाकाराला दिग्दर्शकाने दिला धक्का, अमृता खानविलकरने सांगितला एक धक्कादायक किस्सा

Amruta Khanvilkar: मराठी आणि हिंदी भाषेत अनेक नाटकं, चित्रपट, टीव्ही मालिकांतून काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने एक धक्कादायक किस्सा सांगितला. छान अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकताना किती गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते हे अमृताने किस्सा कथन करून सांगितले.



तस्करी या हिंदी सीरिजचे काम केल्यानंतर दिलेल्या मुलाखती दरम्यान अमृताने गौप्यस्फोट केला. एका सिनेमाच्या सेटवर चुकीची वागणूक मिळाल्याचे अमृता म्हणाली. एका दिग्दर्शकाने मला सेटवर ढकलून दिलं होत. शूटिंगच्यावेळी हा कटू अनुभव आल्याचे अमृता म्हणाली.



सिनेमाच्या सेटवर दिग्दर्शक त्रास होईल अशा पद्धतीने वारंवार टोमणे मारत होता. शूट सुरू होण्याआधी दिग्दर्शक मुद्दाम टोमणा मारत होता. मी ठरवून वारंवार दुर्लक्ष केले आणि शू करत राहिले. अनेकजणी नखरे करतात. सेटवर नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण माझे तसे नाही. मी व्यवस्थित काम करत होते. पण दिग्दर्शक सातत्याने टोमणे मारत राहिला. हा एक अतिशय वाईट अनुभव होता असे ती म्हणाली. नंतर दिग्दर्शकाने भर सेटवरच मला धक्का मारल्याचे अमृता म्हणाली. या प्रकाराने मानसिक धक्का बसल्याचे अमृताने सांगितले.



धक्का बसला आणि माझा मेंदू आणि शरीर यांनी काम करणेच बंद केले. मी खूप घाबरले काय करावे हे समजत नव्हते. सुचतच नव्हते. अखेर मी सेटवरून लगेच निघून गेले, असे अमृताने सांगितले. त्या सेटवर माझ्यासोबत एक पुरुष सहकलाकार होता त्याने ते पाहिलं आणि मग तो जाऊन त्या दिग्दर्शकाशी बोलला. ड्या वर्षांनी माझ्या कानावर आलं की त्या दिग्दर्शकाला वाईट पद्धतीने एका कामावरून अचानक दूर करण्यात आले. अखेर कर्म फिरून त्याच्यापाशी आल्याचे अमृता म्हणाली.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी