Deputy Chief Minister Eknath Shinde : 'एनडीए'च्या नेत्यांना भेटण्यात गैर काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दिलीतील गुप्त दौऱ्याबाबत केले भाष्य


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या गुप्त दिल्ली दौऱ्यावरून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अखेर पडदा हटवला आहे. आपण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली असून, महायुतीचे घटक पक्ष म्हणून एनडीएच्या शीर्ष नेत्यांना भेटण्यात काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणालाही थांगपत्ता लागू न देता अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने महायुतीमध्ये नक्की काय चालले आहे, जागावाटपावरून काही खटके उडाले आहेत का, की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही खलबते सुरू आहेत, यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते. याविषयी शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आणि अंतर्गत मतभेद या विरोधकांच्या मनातील कल्पना आहेत. आम्ही एनडीएचे प्रमुख घटक आहोत आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना धूळ चारण्यासाठी पूर्ण ताकदीने एकत्र उतरणार आहोत. केंद्र आणि राज्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठीच हा दौरा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.