Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेत सूट; केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी

- ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला आचारसंहितेतून विशेष सूट दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी कर्जमाफी आता ३० जूनपूर्वीच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मिळालेल्या या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmer Loan Waiver)



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने या काळात कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येतील का, बाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आता या योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. (Farmer Loan Waiver)


सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज प्रामाणिकपणे आणि नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही सरकारने सन्मान केला आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Farmer Loan Waiver)



३० जूनपूर्वी अंमलबजावणी होणार :


- शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटीद्वारे) वर्ग केली जाईल. खरीप हंगामाची कामे सुरू असतानाच हा निधी हाती येणार असल्याने शेतकऱ्यांची पैशांची नड भागणार आहे.
- गेल्या काही वर्षांत राज्यातील शेती क्षेत्र सातत्याने अस्मानी संकटांचा सामना करत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी अतिवृष्टी आणि त्यातच वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय आणि आता त्याला मिळालेली निवडणूक आयोगाची मंजुरी ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी