Eknath Shinde : मोदी खरे धुरंधर, त्यांच्यावर टीका करणारे..., हर्षवर्धन सकपाळांच्या मोदींवरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील बारा वर्षांत देशाने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेची नवी उंची गाठली आहे. मोदी हेच खरे धुरंधर आहेत, त्यांच्यावर टीका करणारे खऱ्या अर्थाने दलिंदर आहेत. अशी आक्रमक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि विरोधकांवर केली. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवरील टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले,“देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नरेंद्र मोदी हे आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.



गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. भारताला महासत्तेकडे नेण्याचे, आत्मनिर्भर भारत उभारण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य मोदीजींनी केले आहे.”विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “ज्यांनी आयुष्यात देशासाठी कोणतेही भरीव योगदान दिले नाही, ते आज मोदीजींवर टीका करत आहेत. ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ अशीच त्यांची अवस्था आहे. मोदीजींवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. अशा टीकांमुळे मोदींची प्रतिमा कमी होणार नाही, उलट विरोधकांची राजकीय दिवाळखोरीच उघड होत आहे.”



“मोदीजींनी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि निर्णयक्षम नेतृत्व दिले. संरक्षण क्षेत्रात भारताला आयातदारातून निर्यातदार बनवले. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक पातळीवरील ताकद वाढली आहे. बारा वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लावता आलेला नाही. हीच त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी पावती आहे, असेही शिंदे म्हणाले."देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही भारतीय संस्कृती नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण वैयक्तिक पातळीवर घसरून केलेली टीका जनता कधीही सहन करणार नाही. १४० कोटी भारतीय मोदीजींच्या कामगिरीचे साक्षीदार आहेत आणि योग्य वेळी विरोधकांना उत्तर देतील; असे काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना शिंदेंनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण