Raja Shivaji Collection : राजा शिवाजी चित्रपट सुपरहिट, जाणून घ्या कमाईची सविस्तर आकडेवारी

राजा शिवाजी बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) : मराठी चित्रपटसृष्टीत २६ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा 'राजा शिवाजी' चित्रपट आता चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी म्हणजेच चौथ्या सोमवारी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने २५ व्या दिवशी ८३८ शो मधून ०.६१ कोटींची कमाई केली. चित्रपटाने चौथ्या रविवारी १.३० कोटीची कमाई केली होती. त्यामानाने सोमवारच्या कलेक्शनमध्ये ५३.०८ टक्क्यांची घसरण झाली. पण चौथ्या आठवड्यातील वर्किंग डे पाहता ही कमाई सामान्य राहिली.



आतापर्यंत 'राजा शिवाजी' या चित्रपटाने भारतात ९२.५४ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. जगभरातील कमाईचा आकडा ११३.६० कोटी रुपयांवर गेला आहे. चौथ्या आठवड्यातील सोमवारी या चित्रपटाची १५.५१ हजार तिकिटे बुक झाली. यावरूनच या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. २५ दिवसात या चित्रपटाने बुक माय शोवर २५.२१ लाखांहून अधिक तिकिटांचा विक्रीचा टप्पा पार केला आहे. जवळपास महिन्याभरानंतरही प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि या चित्रपटाचं वेड कायम असल्याचं स्पष्ट होतं. पीव्हीआर (PVR), आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलीस (cinepolice) या राष्ट्रीय मल्टिप्लेक्स चेनमध्ये राजा शिवाजी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या तिन्ही चेनमधून सुमारे २.२ हजार तिकिटांची विक्री झाली आणि ३.९ लाख रुपयांचे ग्रॉस कलेक्शन झाले आहे. आयनॉक्स (INOX) मधून २.१ लाख, सिनेपोलीसमधून १.२ लाख आणि पीव्हीआर मधून ०.६ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.



चित्रपटाच्या कमाईत मराठी आवृत्तीचा वाटा मोठा आहे. मराठी आवृत्तीतून चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या २१% होती. हा चित्रपट पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक पाहिला गेला. एकूण भाषावार कमाई पाहता मराठी आवृत्तीने आतापर्यंत ६७.८२ कोटींची नेट कमाई केली. तर हिंदी आवृत्तीचा वाटा २४.७२ कोटी होता. या दोन्ही भाषांमधून केलेल्या कमाईमुळे या चित्रपटाने जगभरात सहज १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’