Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वाद, घुसखोरांना रेशनकार्ड वाटप झाल्याचा आरोप

Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वातावरण तापले असून, अखिल भारतीय हिंदू महासभेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले असून, नाशिक ग्रामीण तहसील कार्यालयातून मंजूर झालेल्या काही रेशनकार्डांबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.


हिंदू महासभेचे संपर्क प्रमुख बापू डापसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चुंचाळे आणि अंबड परिसरात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रेशनकार्डधारक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. काही व्यक्ती बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप करत, त्यांनी रेशनकार्ड मिळवताना कोणती कागदपत्रे सादर केली याची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



स्थानिक पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे. अनेक नागरिकांना वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही रेशनकार्ड मिळत नसताना संशयित व्यक्तींना सहज रेशनकार्ड कसे मिळाले, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष चौकशी समिती नेमून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच अपूर्ण किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजूर झालेली रेशनकार्ड तातडीने रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत सुमारे १ हजार २०० पीपीपी रेशनकार्डांपैकी जवळपास ६० टक्के कार्ड संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुरवठा विभागात यासाठी मोठे जाळे कार्यरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.



मोठी साखळी कार्यरत


कागदपत्रांची अपूर्तता असूनही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस रेशनकार्ड तयार करून दिली जात आहेत. यासाठी नाशिकच्या पुरवठा विभागात मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप आहे. पुरवठा विभागाकडून इष्टांक संपल्याचे सांगितले जात असले, तरी त्यानंतरही रेशनकार्ड वाटप सुरू आहे. याची त्वरित चौकशी करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे संपर्क प्रमुख बापू डापसे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण