Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला तालुक्यातील वाघापूर येथील एका तरुणाने दारूच्या नशेत रात्रीच्या वेळी ११२ डायल नंबरला कॉल करून खोटी माहिती देऊन पोलीसांची दिशाभूल केली. याप्रकरणी रोहिदास गोरक्षनाथ बर्डे (वय ३६) याचे विरुद्ध बी.एन.एस २१२ व मु.प्रोव्ही ऍक्ट ८५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पो.कॉ. मनोहर अशोक मोरे हे अकोले पोलिस स्टेशनला (Akole Police Station) १५ मे रोजी ड्युटीवर असताना रात्री ९.२६ वा वाघापूर येथील रोहिदास गोरक्षनाथ बर्डे याचा MDT वर कॉल आला, त्याला त्याची पत्नी व मेव्हणे मारहाण करून शिवीगाळ करत आहे. याची तात्काळ दखल घेत पो.कॉ मोरे यांनी बर्डे यांना कॉल केला असता जोराने आरडा ओरड करत मी सहा महिन्यापूर्वी माझ्या बायको विरुद्ध तक्रार दिली होती. त्याचे काय झाले असे विचारू लागल्याने त्यांना मोरे यांनी तुमचा तपास पो.हे कॉ. देशमुख याचे कडे आहे त्यांना विचारा नाही तर त्याना तुम्हाला कॉल करण्यास सांगतो असे समजावून सांगितले.



मात्र सदर व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तसे अहिल्यानगर ११२ कंट्रोलला कळवून कॉल केला. त्यानंतर सदर इसम बर्डे हा वारंवार कॉल करत होता. सारखे कॉल करत असल्याने रात्री १:२५ वा पो.स.ई. घोडे, पो. कॉ. गोरे यांना घेऊन मोरे शासकीय वाहनाने वाघापूर गावात गेले. तेथे रोहीदास गोरक्षनाथ बर्डे हा मारुती मंदिराचे पाठीमागे उभा होता. त्याने पोलिसांना पाहताच आरडा ओरड करुन मी फाशी घेईन अशी धमकी देत होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांसह पंचनामा करून त्याला ताब्यात घेऊन पोलीसांनी (Akole Police Station) अकोले येथे आणले.


ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो अमली पदार्थचे सेवन करत असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यावरून त्याने सर्व केलेले कॉल खोटे असून दारूच्या नशेत ११२ वर वारंवार कॉल पोलीस प्रशासनाला त्रास देण्याचे उद्देशाने केले असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अकोले पोलिसात पो.कॉ. मनोहर अशोक मोरे यांचे फिर्याद वरून दारू पिऊन रात्रीच्या वेळी ११२ डायल नंबरला कॉल करून खोटी माहिती देऊन पोलीसांची दिशाभूल केल्याप्रकारणी रोहिदास गोरक्षनाथ बर्डे याचे विरुद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी