Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण रेल्वेवर विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबई-गोवा मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल होणार आहे.या बदलाचा फटका कोकणकन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस यांसारख्या लोकप्रिय गाड्यांना बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे.


मुसळधार पाऊस, रुळांवर पाणी साचणे, झाडे पडणे आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे रेल्वे प्रशासन दरवर्षी मान्सूनवेळी रेल्वेच्या वेळपत्रकात बदल करते. यावेळीही वेळपत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही गाड्या उशिराने धावतीलकोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 15 जून ते 20 ऑक्टोबरदरम्यान मूळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांनाच हे वेळापत्रक लागू असेल. विविध गाड्यांच्या सुधारित वेळांची माहिती स्वतंत्र परिशिष्टाद्वारे जाहीर केली जाणार आहे. ती स्थानकांवरील सूचना फलक, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली आणि अधिकृत माध्यमांतून उपलब्ध करून दिली जाईल.दरम्यान, मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या सध्या 3 ते 4 तास उशिराने धावत आहेत. तसेच मुंबईतील सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांवरील काही गाड्यांचे लास्ट स्टेशनही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अपडेट्स तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.