Nashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; EV कार जळून खाक

Nashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला आहे. सिन्नरहून शिर्डीकडे (Sinnar to Shirdi) जाणाऱ्या टाटा नेक्सन इव्ही कारला (EV Car) अचानक आग लागल्याची घटना घडली. आज (बुधवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कांदळवाडी शिवाराजवळ ही आगीची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय गणेश गीते आणि योगेश प्रकाश घुगे हे दोघे सिन्नरहून शिर्डीकडे (Shirdi) जात असताना त्यांच्या एमएच १५ एचवाय ५५६३ या क्रमांकांच्या टाटा नेक्सन ईव्ही कारमधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखत दोघेही तात्काळ बाहेर पडले. यानंतर काही क्षणांतच वाहनाला भीषण आग लागली. दोघांच्याही प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.



दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासन (Police Administration and Highway Administration) तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर (Trafic) परिणाम झाला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


 
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि