Dombivli Dipesh Mhatre : पिंपळेश्वरनंतर भाजपचं ‘मिशन मलंगगड-दुर्गाडी’; दीपेश म्हात्रेंचा इशारा!

डोंबिवली : डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता भाजपा नेत्यांच्या नव्या भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकारने पिंपळेश्वर मंदिर परिसरातील सुमारे ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट दुर्गाडी किल्ला आणि मलंगगडचा मुद्दा पुढे आणला आहे.



मंगळवारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळेश्वर मंदिरात आरती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. त्यानंतर बुधवारी भाजपाच्या वतीनेही मंदिर परिसरात आरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपाने पिंपळेश्वर मंदिराच्या लढ्यात आपलेही मोठे योगदान असल्याचा दावा केला.

कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते दीपेश म्हात्रे यांनी म्हटले की, “ये तो अभी झांकी है, दुर्गाडी आणि मलंगगड बाकी आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी आगामी काळात भाजपाची भूमिका आणखी आक्रमक असणार असल्याचे संकेत दिले.



दुर्गाडी किल्ला आणि मलंगगड हे दोन्ही धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील विषय मानले जातात. त्यामुळे दीपेश म्हात्रे यांच्या या विधानानंतर कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा हिंदुत्व आणि धार्मिक मुद्द्यांवरून संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने पिंपळेश्वरनंतर आता दुर्गाडी आणि मलंगगडसारख्या विषयांवरही लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून मिळाले. दरम्यान, पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटल्याने स्थानिक भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी