Beed Crime : सावत्र आई अन् मुलाचे अनैतिक संबंध, बदनामीच्या भीतीने घेतला टोकाचा निर्णय

बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र आई अन मुलाच्या अनैतिक संबंध यांचा भयानक शेवट झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईनेही रुग्णालयाच्या परिसरातच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बीडच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथे घडली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी त्याने दुसरे लग्न केले. पती पत्नीचा संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीचा २१ वर्षीय मुलगा अनिल पवार याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. दोघांतील प्रेमसंबंध इतके बनले की काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.



बदनामीच्या भीतीने आयुष्य संपवलं


आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने चिंतेत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा (Telangana )गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजतील या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन करून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. भीतीपोटी अनिलने थेट विष प्राशन केले.


प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (Swami Ramanand Tirtha Hospital) दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला. तर आपला प्रियकर (नात्याने सावत्र मुलगा) अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी