Food and Drug Administration Raids : ‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर थेट कारवाई’; राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत ३३ आरोपींना अटक

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात आली असून, आतापर्यंत 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २७ आस्थापनांवर सील ठोकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Food and Drug Administration Raids)


मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली. बनावट, भेसळयुक्त आणि अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. (Food and Drug Administration Raids)


अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध भागांत अचानक छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, बनावट दूध, अस्वच्छ वातावरणात तयार होणारे पदार्थ आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त केले. या मोहिमेत गुटखा, पानमसाला आणि तंबाखू प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Food and Drug Administration Raids)



२० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त :


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान सुमारे २० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ३४ प्रकरणांमध्ये तपास सुरू असून, 11 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. (Food and Drug Administration Raids)



राज्यभरातील धक्कादायक प्रकार उघड :


धरणगावमध्ये गायीच्या दुधात रसायन मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.



- पुण्यात कार्बाईड रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले. जवळपास 2 लाख रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आले.


- धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करत सुमारे 2.44 लाखांचा साठा जप्त करण्यात आला.


- मुंबईतील धारावी परिसरात नियमांचे उल्लंघन करून गुळाचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.


- नाशिकमध्ये परवानगी नसताना खाद्यपदार्थ उत्पादन, बनावट लेबलिंग आणि निकृष्ट दर्जाचे तेल विक्री करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.


- पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.



“आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर गुन्हे दाखल करू” – तुकाराम मुंढे


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. राज्यभर ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Food and Drug Administration Raids)

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.