Shardha kapoor :"नाचता येईना ..."; श्रद्धाच्या व्हायरल डान्स व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

श्रद्धा कपूर चा एक डान्स विडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात सोशलमीडिया वर व्हायरल होत आहे . त्या व्हिडिओ मध्ये श्रद्धा कपूर मायकल जॅक्सनच्या गाण्यावर मनसोक्त नाचताना तिच्या घरातील पसारा दिसला, ज्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. मात्र, श्रद्धाने तिच्या खास शैलीत मजेदार उत्तर देत ट्रोलर्सना शांत केले.


बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी हलक्या फुलक्या पोस्ट आणि रिल्स अपलोड करत असते.तिचे चाहते नेहमी तिच्या नवीन पोस्ट ची वाट बघत असतात .अशीच एक पोस्ट तिने केली त्यामुळे चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन झालं , परंतू बुधवारी रात्री तिने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यावर कमेंटचा पाऊस पडला. या व्हिडिओत श्रद्धा कपूर दिलखुलासपणे नाचताना दिसत आहे. . तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या व्हिडिओवर ती मनसोक्त नाचत होती . सध्या तिचा हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे.



मायकल जॅक्सनच्या गाण्यावर श्रद्धा मनसोक्त नाचताना दिसत आहे. तिच्या डान्सिंग स्किल्सही या निमित्ताने दाखवत आहे. कॅज्यूअल ड्रेसमधील तिचा हा डान्स अत्यंत मजेदार आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. त्यावर तिने, तुमच्यातील असा डान्स बाहेर आणू शकेल, अशा व्यक्तीचा शोध घ्या, असं कॅप्शन लिहिलं आहे. व्हिडिओच्या शेवटी ती मनमुराद हसतानाही दिसत आहे.
श्रद्धाचा डान्स हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर नवल. व्हिडिओ पोस्ट होताच तो व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटी या पोस्टवर मनमुरादपणे व्यक्त झाले. तर लोकांनी व्हिडिओ क्वीन, वेडी श्रद्धा अशा कमेंट केल्या. पण काही लोकांनी श्रद्धाच्या डान्स ऐवजी तिच्या घरातील पसाऱ्यावर बोट ठेवलं. काही लोकांनी तर तिला त्याबद्दल सल्लाही दिला. बयो, डान्स करण्यापूर्वी घरातील पसारा आवर… काहींनी अशी कमेंट केली. तर काहींनी लिहिलं, डान्स करण्यापूर्वी घरातील घाण स्वच्छ करत जा.


डियर मॉम…


किती घाण घर आहे. कमीत कमी व्हिडिओ तर ग्रीन स्क्रीनवर बनवायचा ना? अशी एकाने कमेंट केलीय. अर्थातच श्रद्धाच्या डोळ्याने या कमेंट्स टिपल्याच. तिनेही या कमेंट्सवर तितक्याच फनी स्टाईलने उत्तर दिलं. डियर मॉम, रियल आयडीने कमेंट कर, असं तिने म्हटलं. तिची ही खुशखुशीत आणि मजेदार कमेंट वाचून तिच्या फॅन्सलाही हसू आवरेना झालं.
राहुलसोबत केमिस्ट्री


श्रद्धा कपूरच्या या व्हिडीओतील राहुल मोदीचा सहभागही चाहत्यांना भारीच आवडला. त्यानेच श्रद्धाला असा डान्स करायला सांगितला. व्हिडिओच्या सुरुवातीला राहुलचा आवाज ऐकायला मिळतो. श्रद्धा आणि राहुल बऱ्याच कालापासून एकत्र आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. पण दोघेही नेहमी एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी तर दोघांच्या लग्नाच्या अफवेचा बाजार उठला होता. पण त्यात काही तथ्य आढळून आलं नाही.

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ