Rahul Dravid : द्रविड इन, फ्लेमिंग आऊट! आयपीएल 2027 हंगामासाठी सीएसकेच्या कोचिंगस्टाफमध्ये मोठी अपडेट आली समोर

आयपीएल २०२६ चेन्नई सुपर किंग्ससाठी फारसा चांगला गेला नाही. संघाला साखळी सामन्यातूनच स्पर्धेबाहेर झावे लागले. २०२३ मध्ये विजेता बनल्यानंतर ते सलग तिसऱ्या हंगामातून साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले आहेत. आयपीएलच्या १९ व्या हंगामात सीएसके आठव्या स्थानी राहिली. संघाच्या अशा खराब कामगिरीमुळे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना बदलण्याची जोरदार मागणी होत आहे. दरम्यान राहुल द्रविडला सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमावे, अश्या काही बातम्या समोर येत आहेत. या अफवा आहेत, असे म्हणत फ्रॅंचायजीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी म्हटले आहे.


फ्लेमिंगच्या भविष्याबद्दल सीएसकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे विश्वनाथन यांनी क्रिकबजला सांगितले आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार फ्लेमिंग धोनीसोबत सीएसकेच्या पाचही विजेतेपदांचा भाग होता, मात्र गेल्या काही हंगामापासून संघासाठी काहीही चांगल घडत नाही आहे. मागील दोन वर्षांत आधुनिक टी२० शैलीने खेळावर वर्चस्व मिळवले आहे. यामध्ये सीएसके काहीसा मागे पडला आहे, हे फ्लेमिंग यांनी मान्य केले होते. त्यासाठी त्यांनी आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्याआधी संघाची शैली बदलली, मात्र सध्याचा संघ अधिक तयार दिसला होता मात्र दुखापतींमुळे संघाला मोठा फटका बसल्याच दिसून आले.


सीएसकेची मागील तीन हंगामातील कामगिरी


संघाची मागील तीन हंगामातील कामगिरी पाहिली तर त्यांना गुणतालिकेत ५ व्या, १० व्या आणि ८ व्या स्थानांवर समाधान मानावे लागले आहे. यादरम्यान त्यांनी १७ सामने जिंकले आणि २५ गमावले आहेत. अशी निराशाजनक कामगिरीमुळे फ्लेमिंगची जागी राहुल द्रविड घेतले जावे अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी २०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स सोडले होते. सध्या ते कोणत्याही आयपीएल संघाचे भाग नाहीत.फ्लेमिंग यांच्या कराराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींवर सध्यातरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही योग्य वेळी घोषणा करू, असे विश्वनाथन म्हणाले आहेत.


फ्लेमिंग सध्या मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्ज आणि SA20 मधील जोबर्ग सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. एमएलसी २०२६ हंगाम येत्या १८ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे फ्लेमिंग यांना त्या स्पर्धेतून हटवले जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच एमएस धोनी मुख्य प्रशिक्षक असणार का, याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याला पुढील हंगामात खेळाडू म्हणून परतायचे की प्रशिक्षक किंवा मार्गदर्शन म्हणून संघात कायम राहायचे हा निर्णय फ्रॅंचायजीने संपूर्णपणे धोनीवर सोपवला आहे.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात