Reel Star Rohini Death : वैवाहिक मतभेद की व्यवसायातील ताण? रिल्सस्टार रोहिणी पाराध्येंनी का संपवलं आयुष्य? पोलिसांकडून तपास सुरु

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या २५ वर्षीय रोहिणी निलेश पाराध्ये यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हॉटेल व्यवसायातून आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंमधून रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (Reel Star Rohini Death)


मंगळवारी दुपारी ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नेमकं असं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (Reel Star Rohini Death)



प्राथमिक माहितीनुसार, रोहिणी आणि त्यांचे पती निलेश यांनी प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय विवाहानंतर काही काळ दोघे पुण्यात वास्तव्यास होते. त्याच काळात त्यांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे विनोदी आणि कौटुंबिक वातावरणावर आधारित व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर दोघे मूळ गावी परतले आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने व्यवसाय सुरू केला. (Reel Star Rohini Death)


हॉटेलमधील दैनंदिन घडामोडींवर आधारित रिल्समुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. ग्राहकांची गर्दी वाढू लागल्यानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आणखी दोन शाखा सुरू केल्या. मात्र वाढता व्यवसाय, आर्थिक व्यवस्थापन, नवीन शाखांची जबाबदारी आणि सततचा ताण यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. (Reel Star Rohini Death)



सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी होती. त्यानंतर मंगळवारी हॉटेल उघडण्यात आले नाही. दुपारच्या सुमारास रोहिणी यांनी स्वयंपाकघरात आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Reel Star Rohini Death)


दरम्यान, रोहिणी यांचा हा दुसरा विवाह असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे वैवाहिक मतभेद, व्यवसायातील ताण किंवा अन्य कोणते कारण या घटनेमागे होते का? याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृतरीत्या कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. (Reel Star Rohini Death)


मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. सोशल मीडियावर हसतमुख दिसणाऱ्या या तरुणीच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. (Reel Star Rohini Death)


Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.