Singapore Open 2026 : पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक-चिरागची दमदार आगेकूच; उपांत्यपूर्व फेरीत भारताची मजबूत दावेदारी

सिंधूचा जपानी खेळाडूवर एकहाती विजय; लक्ष्य सेनला वॉकओव्हर


सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळांडूनी चांगली कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू, स्टार शटलर लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीतील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने दमदार विजय मिळवत पुढील फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीत पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजीचा अवघ्या दोन गेममध्ये 21-9, 21-12 असा सहज पराभव केला. सुरुवातीपासूनच सिंधूने सामन्यावर वर्चस्व राखला होता. तीने प्रतिस्पर्धीला कोणतीही संधी दिली नाही. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर मोठं आव्हान असणार आहे. तिचा सामना आता दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित ॲन से यंगशी होणार आहे. हा सामना सिंधूसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


लक्ष्य सेनला नशिबाची साथ


पुरुष एकेरीत भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि थायलंडचा खेळाडू कुन्लावुत विटिडसर्न याने सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे लक्ष्य सेनला वॉकओव्हर मिळाला आणि थेट उपांत्यपूर्व फेरित स्थान मिळाला.आता उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनचा सामना जपानच्या कोकी वातानाबेशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेला वातानाबे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.


सात्विक-चिरागची संघर्षपूर्ण जीत


भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मात्र पुढील फेरी गाठण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली. त्यांनी चायनीज तैपेईच्या ली झी हुई आणि यांग पो सुआन या जोडीचा 21-15, 11-21, 21-18 असा पराभव केला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय जोडीने निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना आता मलेशियाच्या खाई जिंग कांग आणि ॲरॉन ताई या जोडीशी होणार आहे.


ध्रुव-तनिषाचीही उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री


मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीनेही शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. त्यांनी जपानच्या युटा वातानाबे आणि माया तागुची या जोडीचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने दमदार कमबॅक करत सलग दोन गेम जिंकले. आता त्यांचा सामना कोरियाच्या किम जे ह्योन जांग-हा जोंग जोडी किंवा मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित चेन टँग जी-तोह ई वेई यांच्यापैकी एका जोडीशी होणार आहे.


भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या


सिंगापूर ओपनमध्ये भारतीय खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी पाहता भारताच्या पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. अनुभवी सिंधूपासून युवा लक्ष्य सेनपर्यंत आणि दुहेरीतील सात्विक-चिरागपर्यंत सर्वच खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून