Solapur Crime : सोलापूर हादरलं ! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं उचललं टोकाचं पाऊल; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

अक्कलकोटमधील धक्कादायक घटना; विहिरीत उडी घेत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू...


Crime News : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.


मृत महिलेचं नाव भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय ३०) असं आहे, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटच्या मैंदर्गी परिसरातील तोरणी रोडजवळील विहिरीत तिने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह उडी घेतली. या घटनेत दोन वर्षीय शिवराजचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर भाग्यश्रीचा मृतदेहही पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोघांनाही अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र,डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं.


सासरकडून सतत छळ होत होता; आईचा आरोप


या घटनेनंतर भाग्यश्रीच्या आई कलव्वा बसप्पा पुजारी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि कौटुंबिक छळ केला जात होता. असा गंभीर आरोप भाग्यश्रीच्या आईने केला आहे. तक्रारीमध्ये पती, सासू, सासरे, दोन दीर, नणंद आणि इतर नातेवाईकांसह एकूण सात जणांवर आरोप करण्यात आला आहेत. कौटुंबिक वाद आणि सततच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


पोलिसांकडून तपास सुरू


या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस अधिक तपास करत आहेत, मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.