Magnus Carlsen Norway Chess 2026 : प्रज्ञानानंदाचा ऐतिहासिक विजय ! जगज्जेता कार्लसनला हरवले; गुकेश पुन्हा पराभूत !

नॉर्वे चेसमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी; दिव्या देशमुखची विजयी अभियान कायम..


भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने नॉर्वे चेस २०२६  स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभूत करत मोठा उलटफेर घडवून आणला. क्लासिकल फॉरमॅटमध्ये मिळवलेल्या या शानदार विजयामुळे प्रज्ञानानंदाने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळ विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विजयासह तो ४.५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे.विशेष म्हणजे, नॉर्वे चेस स्पर्धेत प्रज्ञानानंदाने कार्लसन क्लासिकल फॉरमॅटमध्ये दुसऱ्या वेळा पराभूत झाला आहे. यापूर्वी २०२४ मध्येही त्याने माजी विश्वविजेत्याला धक्का दिला होता. सामन्यानंतर प्रज्ञानानंद म्हणाला की, सामना अत्यंत बरोबरीचा झाला आणि शेवटच्या क्षणी निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकत होता.


सात वेळांचा चॅम्पियन कार्लसन तळाला


घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सात वेळच्या विजेत्या मॅग्नस कार्लसनची मात्र स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरू आहे. सहा खेळाडूंच्या स्पर्धेत तो केवळ १.५ गुणांसह शेवटच्या स्थानावर घसरला आहे. प्रज्ञानानंदाविरुद्धचा पराभव कार्लसनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


गुकेशचा सलग दुसरा पराभव


दरम्यान, विद्यमान विश्वविजेता डी गुकेशचा खराब फॉर्म कायम राहिला आहे. फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाने त्याला आर्मगेडन टायब्रेकरमध्ये पराभूत करत १.५ गुण मिळवले. जवळपास पाच तास चाललेला क्लासिकल सामना ड्रॉमध्ये सुटला, मात्र आर्मगेडनमध्ये फिरोजाने बाजी मारली. जखमी अवस्थेत खेळत असूनही फिरोजाने सलग विजय मिळवत 7.5 गुणांसह अव्वल स्थान अधिक मजबूत केलं आहे. सामना संपल्यानंतर तो व्हीलचेअर आणि मून बूटमध्ये दिसला. दुसरीकडे गुकेश ३.५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पुढील फेरीत त्याचा सामना थेट मॅग्नस कार्लसनशी होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.


दिव्या देशमुखची विजयी मालिका कायम


महिला गटात भारताच्या दिव्या देशमुखने दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. तिने स्पर्धेतील आघाडीवर असलेल्या बिबिसारा असाउबायेवाला आर्मगेडनमध्ये पराभूत करत तिसरा टायब्रेकर विजय नोंदवला आहे. या विजयासह दिव्या ४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर अनुभवी भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अन्ना मुजिचुककडून पराभव पत्करावा लागला. ती दोन गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.


काय असतो आर्मगेडन फॉरमॅट?


बुद्धिबळात आर्मगेडन हा सडन-डेथ टायब्रेकर प्रकार असतो. क्लासिकल सामना ड्रॉ झाल्यास निकाल निश्चित करण्यासाठी हा सामना खेळवला जातो. या फॉरमॅटमध्ये ड्रॉची शक्यता नसते आणि कोणत्याही परिस्थितीत विजेता निश्चित केला जातो.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या