Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. याचाच फायदा लुटारूंनी घेतला. तात्काळ दर्शनाच्या एका तिकीटासाठी भाविकांना चार ते पाच हजार रुपयांना लुटण्यात येत होते. हा प्रकार बाहेर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.


अखेर दर्शनाच्या नावाखाली होणारा काळाबाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या (Trimbakeshwar) वतीने शीघ्र दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली. यासाठी अडीच हजार रुपये दर ठरविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी ३० हून अधिक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.




जलद देणगी दर्शन व्यवस्थेला सुरूवात


याबाबत मागील काही बैठकींमध्ये ठराव करण्यात आला होता. यानुसार गुरूवारी जलद देणगी दर्शन व्यवस्थेला सुरूवात झाली. यासाठी कुठलाही मध्यस्थ न ठेवता देवस्थानच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जलद देणगी दर्शनाविषयी विचारणा केल्यास त्याला देवस्थान कर्मचाऱ्याकडे नेले जाते. त्याचे आधारकार्ड पाहून तिकीट दिले जात आहे.



जमा होणारा निधी कुंभपर्वात वापरणार


या उपक्रमाविषयी स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी देवस्थान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याविषयी विश्वस्त कैलास घुले यांनी समर्थन केले. काही वर्षांमध्ये देवस्थानात दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला गैरप्रकार समोर आला. आतापर्यंत पोलीस ठाण्यात याविषयी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी आलेला सधन भाविक हा वेळेत दर्शन करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. या नादात काही वेळा गैरमार्गाचा अवलंब होतो. हे टाळण्यासाठी देवस्थानच्या वतीने अति जलद देणगी दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. या माध्यमातुन जमा होणाऱ्या निधीसाठी स्वतंत्र खाते खोलण्यात आले असून या निधीचा वापर कुंभपर्वात विविध कामांसाठी होणार असल्याचे घुले यांनी नमूद केले.




मंदिर प्रशासनाने निर्णय का घेतला ?


बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. ही गर्दी येथील अर्थकारणाचा केंद्रबिंदु आहे, बऱ्याचदा भाविकांकडून येथील गर्दी पाहता काही वेगळ्या मार्गाने दर्शन घेता येईल का, याची चाचपणी करण्यात येते. यामध्ये स्थानिक हॉटेल व्यावसायिक, देवस्थानचे काही विश्वस्थ, कर्मचारी यांचा सहभाग राहिला आहे. या पध्दतीने भाविकांना लुटणारी स्वतंत्र साखळी तयार झाली. एका तिकीटासाठी भाविकांना चार ते पाच हजार रुपयांना लुटण्यात आले. ऑनलाईन देणगी दर्शनातही विश्वस्थांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घोळ घालत भाविकांची लुट होत राहिली. या प्रकरणात देवस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दर्शनाच्या नावे होणाऱ्या काळाबाजाराला चाप बसावा, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रायोगिक तत्वावर अडीच हजार रुपये दर्शन तिकीट ठरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण