विसरण्याचं टेन्शन विसरा, सगळं लक्षात ठेवा; दररोज फक्त १० ब्रेन एक्सरसाईझ करा

आजकालची मुलं खूप अभ्यास करतात, पण काही वेळातच सगळं विसरून जातात. त्यामुळे केवळ अभ्यास करून उपयोग नाही, तर लक्षात ठेवण्याची क्षमता मजबूत असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही सोप्या ब्रेन एक्सरसाइजमुळे विद्यार्थ्यांची मेमरी पॉवर वाढण्यास मोठी मदत होऊ शकते.



विद्यार्थ्यांसाठी १० ब्रेन एक्सरसाइज


1. रोज पझल्स आणि कोडी सोडवा


कोडी, पझल्स आणि ब्रेन गेम्समुळे मेंदू सतत सक्रिय राहतो आणि विचारशक्ती वाढते. त्यामुळे आयक्यूही वाढतो असं म्हटलं जात.


2. Sudoku खेळा


Sudoku खेळल्याने एकाग्रता आणि लॉजिकल थिंकिंग सुधारते.


3. बुद्धिबळ खेळण्याची सवय लावा


Chess रणनीती आखण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते.


4. नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा


नवीन भाषा शिकल्याने मेंदूचे अनेक भाग एकाच वेळी काम करतात, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.


5. पुस्तक वाचून आठवण्याचा प्रयत्न करा


वाचलेली गोष्ट पुन्हा आठवण्याची सवय लावल्यास मेमरी मजबूत होते.


6. Mind Map तयार करा


चार्ट किंवा डायग्रामच्या मदतीने माहिती लक्षात ठेवणं अधिक सोपं होतं.


7. कविता किंवा भाषण पाठ करा


कविता, भाषण किंवा डायलॉग पाठ केल्याने स्मरणशक्ती सुधारते.


8. कॅलक्युलेटरशिवाय गणित सोडवा


मानसिक गणितामुळे मेंदूची गती आणि फोकस दोन्ही वाढण्यास मदत होते.


9. Memory Games खेळा


चित्र, शब्द किंवा आकडे लक्षात ठेवण्याचे गेम्स मेंदूला ट्रेनिंग देतात.


10. ध्यान आणि मेडिटेशन करा


Meditation केल्याने ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.


फक्त एक्सरसाइज करण्याने मेंदू फास्ट होत नाही, तर काही महत्त्वाच्या सवयीही अंगी बाणवण्याची गरज असते. पुरेशी झोप घेणे, पौष्टिक आहार घेणे, प्रॉपर व्यायाम करणे, दररोज ठराविक वेळ अभ्यास करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल कमी वापरणे. सतत सराव आणि योग्य दिनचर्या पाळल्यास विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती नक्कीच सुधारू शकते आणि अभ्यासातही चांगले यश मिळू शकते.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''