Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं कर्णधारपद धोक्यात; व्यवस्थापनाचा संयम संपला...

Mumbai : तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. संघाला १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले. संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. सलग सहाव्या वर्षी ट्रॉफीपासून दूर राहिल्यानंतर आता संघ व्यवस्थापनाचा संयम संपल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला MI मधून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अद्याप MI व्यवस्थापनाचा अधिकत निर्णय आलेला नाही. पण चाहत्यांमध्ये हार्दिकला MI मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.


हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह


हार्दिक पांड्याने २०२४ मध्ये गुजरातमधून मुंबईमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदापासून दूर करण्यात आले होते. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. २०२५ मध्ये मुंबई प्लेऑफपर्यंत पोहोचली खरी, पण फायनल गाठण्यात संघाला अपयश आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये संघाची कामगिरी आणखी खालावली. त्यामुळे हार्दिकचं कर्णधारपदच नव्हे, तर अंतिम संघातील त्याच्या स्थानावरही शंका व्यक्त केली जात आहे.


व्यवस्थापन नाराज?


काही मीडिया रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापन हार्दिकच्या रणनीती आणि नेतृत्वावर समाधानी नसल्याचं बोललं जात आहे. पॉवरप्लेचा योग्य वापर करण्यात अपयश, बदलत्या टी-२० क्रिकेटशी जुळवून न घेणं आणि प्रशिक्षकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणं हे मोठे मुद्दे मानले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरातमध्ये सुपरहिट, मुंबईत संघर्ष


विशेष म्हणजे २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केलं होतं. त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व स्वीकारत पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. पुढच्या वर्षीही गुजरात फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र मुंबईत पुनरागमनानंतर हार्दिकला तोच प्रभाव निर्माण करता आला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.


रोहित पुन्हा कर्णधार?


सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आता एकच प्रश्न चर्चेत आहे हार्दिक बाहेर आणि रोहित पुन्हा कॅप्टन ? अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण MI चे व्यवस्थापन लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या