IPL 2026 Qualifier-2 : पावसाचं सावट, तरीही महामुकाबल्यासाठी रंगमंच सज्ज! आज GT vs RR मध्ये लढत...

GT VS RR : आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जबरदस्त लढत होणार आहे. न्यू चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. आजच्या हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान खात्याने मोहाली-चंदीगड परिसरात ६० ते ७० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. सामना रद्द झाल्यास राजस्थान रॉयल्सचं मोठा धक्का बसू शकतो. गुणतालिकेत गुजरात टायटन्स वरच्या स्थानावर आहे, त्यामुळे त्यांना थेट फायनलमध्ये एंट्री मिळू शकते, तर राजस्थान स्पर्धेबाहेर जाऊ शकते. त्यामुळे राजस्थानसाठी हा सामना डू ओर डाय अशा स्वरुपाचा आहे.



वैभव सूर्यवंशीकडे सर्वांच्या नजरा


एलिमिनेटरमध्ये फक्त २९ चेंडूत ९७ धावांची तुफानी खेळी करून वैभव सूर्यवंशीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. उण्यापुऱ्या 15 वर्षांच्या या युवा फलंदाजाने एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्याच्याकडून स्फोटक खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्यासारखी मजबूत फलंदाजी आहे. विशेष म्हणजे साई सुदर्शनला आज ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी आहे.


पिच रिपोर्ट


महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनूकूल मानली जाते. मागील काही सामन्यांपासून या मैदानावर २०० पेक्षाजास्त धावा जाल्या आहेत. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. २७ मे रोजी झालेल्या एलिमिनेटरमध्ये १८ पैकी १२ विकेट्स पेसर्सनी मिळवल्या होत्या. त्यामुळे जोफ्रा आर्चर, रबाडा आणि सिराज यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.


हेड टू हेडमध्ये गुजरातचं वर्चस्व


GT आणि RR यांच्यात आतापर्यंत 10 सामने झाले आहेत . यात गुजरातने 7 सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगामातही गुजरातने राजस्थानला दोन्ही वेळा पराभूत केलं आहे. आज पावसापेक्षा मोठा प्रश्न एकच आहे, तो म्णजे वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ येणार की शुभमन गिलची गुजरात फायनल गाठणार?



संभाव्य Playing 11


राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासुन शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, बृजेश शर्मा, सुशांत मिश्रा.


गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, राहुल तेवतिया.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून