Nashik Crime : स्टॉक मार्केटींगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत साठ लाखांची फसवणूक, दोघे जेरबंद

Nashik Crime : स्टॉक मार्केटींग मध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवुन देवु असे आमिष दाखवून सुमारे साठ लाख रूपयांची फसवणुक करणाऱ्या दोघा संशयितास गुन्हे शाखा दोनच्या पथकाने शिताफीने रायगड जिल्हयातून जेरबंद केले आहे .



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान हा सर्व प्रकार घडला. फिर्यादी व त्यांचे मित्र अशांना फ्युचर स्टॉक मार्केट एनलिसेस नावाची इनव्हेस्टमेंट फर्म असल्याचे भासवुन यातील संशयित इसम यश जानवलकर, युवराज जानवलकर अशांनी त्यांचे फर्म मध्ये फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना पैसे गुंतवणुक करण्यास सांगून त्यांचे कडून एकुण साठ लाख रूपयांची रक्कम घेतली. अन नंतर कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. त्यावरून फिर्यादी यांनी अंबड पोलिस ठाण्यात १८ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल केला.



त्याअनुषंगाने सदर गुन्हयातील आरोपीतांचा गुन्हेशाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असतांना तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून आरोपी हे रायगड येथे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे आरोपीला जेरबंद करण्यासाठी रायगडला रवाना झाले.


त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, सुनिल खैरनार अशांचे पथक रायगड जिल्हयात जावुन आरोपींचा शोध घेत असतांना सदर गुन्हयातील आरोपी युवराज जाणवलकर हा खोपोली परिसरात असुन दुसरा आरोपी यश जाणवलकर हा नेरूळ या परिसरात आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार नमुद पथकाने खोपोली तसेच नेरूळ परिसरात जावून आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी युवराज सुरेश जानवलकर, आणि यश सुरेश जानवलकर हे मिळून आले. दोघांनाही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना नाशिक येथे आणुन पुढील कारवाई कामी अंबड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Ashok Kharat Case : मोठी अपडेट ! भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम बाजू मांडणार

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि