Yeola : १५० क्विंटल कांदा उकिरड्यावर , उष्णतेमुळे साठवणुकीतील कांदा धोक्यात

येवला : हवामानातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. येवला (Yeola) तालुक्यातील पारेगाव (Paregaon) येथे कांदा चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याची घटना समोर आली आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे चार पैसे जास्तीचे मिळतील या आशेने कांदा साठवला होता, मात्र आता तोच कांदा कुजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.



अतिउष्णतेने कांदा शिजला; लागली बुरशी


पारेगाव येथील शरद रामभाऊ खिल्लारे या शेतकऱ्याचा अंदाजे १२५ ते १५० क्विंटल (एकूण पाच ट्रॉली) कांदा अतिउष्णतेमुळे पूर्णपणे सडला आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका चाळीतील साठवणुकीला बसला. कमालीच्या तापमानामुळे कांदा चाळीतच शिजून गेल्यासारखा झाला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झाली आहे. हा सडलेला कांदा आता बाजारात विक्रीयोग्य राहिला नसल्यामुळे, अत्यंत जड अंतःकरणाने शेतकऱ्यांवर हा कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. (Loss of 150 quintals of onion)



कांद्याचे कोलमडलेले अर्थकारण


शेतकरी उन्हाळी म्हणजेच रब्बी कांदा मोठ्या आशेने चाळीमध्ये साठवून ठेवतात. पावसाळ्यात जसे भाव सापडतील, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हा कांदा बाजारात विकला जातो. यातून मिळणाऱ्या भांडवलावरच शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यावर्षी साठवणूक केल्यानंतर अवघ्या महिना-दीड महिन्यातच बदललेल्या हवामानाचा आणि वाढत्या पाऱ्याचा तीव्र फटका साठवणुकीतील कांद्याला बसला आहे. त्यामुळे पुढील पिकांच्या भांडवलाचा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (Loss of 150 quintals of onion)



शासकीय अनुदानाची वाढती मागणी


कांद्याला योग्य भाव मिळावा आणि निर्यातबंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी नुकतेच नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. कांद्याचा प्रश्न आधीच पेटलेला असताना, आता चाळीत साठवलेल्या कांद्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून शासनाने तातडीने पारेगाव व परिसरातील चाळींचे पंचनामे करावेत आणि साठवलेल्या कांद्याच्या नुकसानीसाठी थेट आर्थिक अनुदान द्यावे, अशी तीव्र मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण