Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अफवा! ३० कोटी आणि आलिशान फ्लॅटच्या चर्चांवर ललित मोदींचं स्पष्ट उत्तर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा युवा फलंदाज वैभव सुर्यवंशी पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यामध्ये दावा करण्यात आला आहे की मुंबई इंडियन्स कडून वैभवला संघात घेण्यासाठी तब्बल ३० कोटी रुपये, मुंबईतील आलिशान फ्लॅट आणि मालदीवमध्ये खासगी आयलंडची ऑफर देण्यात आली आहे.या चर्चेमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी या दाव्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.



सर्व दावे खोटे आणि तथ्यहीन- ललित मोदी


ललित मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आयपीएलच्या नियमांनुसार कोणत्याही फ्रँचायझीला एखाद्या खेळाडूला थेट पैसे किंवा महागड्या भेटवस्तू देऊन संघात सामील करून घेण्याची परवानगी नाही.खेळाडूचा संघ बदल किंवा नव्या संघात प्रवेश हा फक्त ट्रेडिंग विंडो आणि अधिकृत ऑक्शन प्रक्रियेद्वारेच होऊ शकतो. मोदींनी या व्हायरल पोस्टमधील सर्व दावे “पूर्णपणे खोटे, चुकीचे आणि तथ्यहीन” असल्याचं सांगत अफवांना पूर्णविराम दिला.


वैभवची लोकप्रियता शिगेला


अत्यंत कमी वयात आयपीएल २०२६ मध्ये आक्रमक फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मोठमोठ्या गोलंदाजांविरुद्ध विस्फोटक फलंदाजी केल्याने तो सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेचा युवा खेळाडू आहे.


सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा


या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही. कोणतीही मोठी बातमी मान्य करण्यापूर्वी अधिकृत माहिती किंवा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या