Chandrapur Crime : २ मुलांची विक्री, नराधम आईचे सत्य समोर आल्यावर पोलीसही सुन्न !

चंद्रपूर : चंद्रपुरात स्वतःच्या पोटच्या मुलांचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी आई आणि तिच्या नराधम प्रियकराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्याच १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा कट रचला होता, जो पोलिसांनी उधळून लावला.


याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नराधम आईसह, नवजात बाळाची खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या चौघांवरही मानवी तस्करी आणि 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



लिव्ह-इन जोडीदाराची अल्पवयीन मुलीवर नजर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. हे दोघेही त्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांतच नराधम अजयची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली.


चंद्रपुरात या पाप कर्माची वाच्यता होईल या भीतीने अजय आणि मुलीच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून, "पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली" अशी खोटी कथा रचून मुलीचे वय २० वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे 'एमएनसी'(MNC) पाठवली. अजनी पोलिसांनी तातडीने 'झिरो एफआयआर' नोंदवत हे प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांकडे पाठवले.



स्वतःचीच मुले विकणारा अमानुष 'व्यवसाय'


या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर जबाब घेतले, तेव्हा त्यांना यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला.



दोन मुलांची आधीच विक्री


पोलिसांनी जेव्हा पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून पोलिसही सुन्न झाले. तिने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकली होती. अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे विक्री करणार होती.


या धक्कादायक सत्यानंतर रामनगर पोलिसांनी मानवी तस्करीचे कलम जोडले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून, तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून अटक केली. पोलीस आता फरार मुख्य आरोपी अजयचा शोध घेत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का?, याचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी