Gas Production : नागपुरात होणार कचऱ्यापासून गॅसनिर्मिती

देशातील पहिला प्रकल्प; ३०० कोटींची गुंतवणूक, प्रतिदिन २८ टन गॅसनिर्मितीचे उद्दिष्ट


मुंबई : कचऱ्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी नागपूर महापालिकेने स्तुत्य पाऊल उचलले असून, भांडेवाडी येथे देशातील पहिला एकात्मिक शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जात आहे. संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून उभारल्या जाणाऱ्या या ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे नागपूर शहर कचरामुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील दररोजच्या तब्बल १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून, त्यातून प्रतिदिन २८ टन बायोगॅसची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. या प्रकल्पामुळे नागपूर हे घनकचरा व्यवस्थापनात देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



भांडेवाडी परिसरातील या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 'केवा सुस बडे' या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे हा प्रकल्प उभारला जात आहे. याप्रसंगी महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दानी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर प्रामुख्याने उपस्थित होते.


हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून, येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. शहरातून संकलित होणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर अत्यंत आधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. या प्रक्रियेनंतर केवळ बायोगॅस नव्हे, तर चांगल्या दर्जाचे कंपोस्ट खत आणि सुक्या कचऱ्यापासून 'पॉवर प्लेट्स' (इंधन) तयार केले जाणार आहे. या पॉवर प्लेट्सचा वापर 'महाजनको'च्या वीज केंद्रांसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जाईल.



दरवर्षी १५ लाख रुपयांची रॉयल्टी मिळणार :


खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही. उलट, शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनावर मनपाचा होणारा कोट्यवधी रुपयांचा दैनंदिन खर्च यामुळे वाचणार आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी ३० एकर जागा उपलब्ध करून दिली असून, उत्पादित होणाऱ्या गॅसच्या विक्रीतून मनपाला दरवर्षी १५ लाख रुपयांची रॉयल्टी देखील मिळणार आहे.



सार्वजनिक वाहतुकीसाठी वापर होणार :


या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या बायोगॅसचा वापर शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी केला जाईल. नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यातील १९८ बसेससाठी या गॅसच्या माध्यमातून 'सीएनजी' (ग्रीन एनर्जी) इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असून, यामुळे परिसरातील नागरिकांना अथवा निसर्गाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी