MP Narayan Rane : मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाजघटक वेगळे; खासदार नारायण राणे

खासदार नारायण राणे; 'सरसकट' शब्दाला माझा विरोध


मुंबई : "मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाजघटक वेगळे असून, मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला माझा विरोध आहे," अशी भूमिका भाजप खासदार नारायण राणे यांनी शनिवारी मांडली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.



खा. राणे म्हणाले, राज्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असताना अशा आंदोलनांना परवानगी का दिली जाते? उद्या जरांगेंच्या जीवाला काही धोका निर्माण झाला, तर त्याचे खापर सरकारवरच फुटणार आहे. मग सरकारचे मंत्री तिथे जाऊन भेटीगाठी का घेत आहेत?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नाला सरकारकडून नेहमीच विलंब लावला जातो. आताही केवळ श्रेय घेण्यासाठी जो तो उठतोय आणि जरांगेंना भेटायला अंतरवालीत धाव घेतोय. या भेटीगाठींमधून निष्पन्न काहीच होत नाही. त्यापेक्षा जरांगेंचे जे म्हणणे आहे, ते समोर ठेवून सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि मराठ्यांना त्यांचे हक्काचे आरक्षण द्यावे," असा सल्ला त्यांनी दिला.



"मराठे आणि कुणबी यांच्यात फरक आहे. कुणबी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळतच आहे, त्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसींमध्ये समाविष्ट करणे योग्य नाही. मराठा समाज हा या राज्यात ३२ टक्के आहे, त्यामुळे त्यांचा स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न सरकारने प्राधान्याने आणि अत्यंत गांभीर्याने हाताळला पाहिजे," अशी मागणी खा. नारायण राणे यांनी केली.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर