Bhimashankar Temple Reopening Date : भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले; ऑनलाईन पास अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नूतनीकरण आणि विकासकामांनंतर मंदिर प्रशासनाने १५ जून २०२६ पासून नियमित दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग


सन २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून भीमाशंकर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिराच्या मुख्य सभामंडपासह पायरीमार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. याच कारणास्तव मंदिर प्रशासनाने ९ जानेवारी २०२६ पासून दर्शनासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवले होते. नंतर या बंदीची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली होती.



वर्षभराचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण


मंदिरासमोरील नवीन सभामंडप उभारण्यासाठी साधारणपणे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. मात्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ, कामगार आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे महत्त्वाचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्णत्वास आले आहे.




  • दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक

  • मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत.

  • ५ जून २०२६ पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

  • नोंदणीसाठी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागेल.

  • सुरुवातीला दररोज फक्त एक हजार भाविकांनाच दर्शनाची परवानगी दिली जाईल.

  • नोंदणी केलेल्या भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

  • १५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११ अशी असेल.

  • दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील.



भाविकांना प्रशासनाचे आवाहन


भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने भाविकांना नव्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दर्शनासाठी येताना ऑनलाईन पास आणि वैध ओळखपत्र सोबत ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


१५ जूनपासून पुन्हा सुरू होणाऱ्या भीमाशंकर मंदिर दर्शनामुळे राज्यभरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविक आता ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने