Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा तिचा दुसरा OTT प्रोजेक्ट आहे. रात्रीचा काळोख… कोलकात्याच्या ओस पडलेल्या रस्त्यांवर अचानक सायरनचा आवाज घुमतो… आणि पुढच्या क्षणी सुरू होतो एका खुनाचा थरारक तपास. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आगामी वेबसीरिजचा १ मिनिट ५१ सेकंदांचा थरारक ट्रेलर समोर आलाय. काही मिनिटांतच सोशल मीडियावरही या सिरीजची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण हा फक्त आणखी एक क्राइम थ्रिलर नाही… कारण या कथेत प्रत्येक चेहऱ्यामागे एक रहस्य दडलंय आणि प्रत्येक संवादानंतर संशय आणखी गडद होत जातो.


करिश्माचा आतापर्यंतचा सर्वात थरारक अवतार?


करिष्मा कपूरच्या 'ब्राउन' वेब सिरीज(Brown Webseries)चा ट्रेलर सध्या प्रचंड चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये करिश्मा कपूर ‘रीटा ब्राउन’ या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. पण ही नेहमीसारखी धाडसी, सगळं नियंत्रणात ठेवणारी ऑफिसर नाही. तिच्या डोळ्यांमध्ये झोप नाही… चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतो… आणि भूतकाळातील काही जखमा अजूनही तिचा पाठलाग करत असल्याची जाणीव सतत होते. एका हाय-प्रोफाइल टीनएजर मर्डर केसचा तपास करताना रीटा एका अशा जाळ्यात अडकत जाते, जिथे सत्य आणि खोटं यामधली रेषाच पुसट होत जाते. दरम्यान शहरात आणखी एक खून होतो… आणि केस अधिकच भयावह बनते. ट्रेलरमधील एक संवाद अक्षरशः अंगावर काटा आणतो -“जो वाचवतो तो देव… जो मारतो तो दानव… पण देव आणि दानव यांच्या मध्ये माणूस कुठे आहे?”


प्रत्येक पात्र संशयित… विश्वास ठेवणार कोणावर?


जिशू सेनगुप्ता एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसतो. तो शांत आहे… संयमी आहे… पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवल्याची भावना सतत जाणवते. तर सूर्या शर्मा रीटाचा ज्युनियर अधिकारी बनून तपासात मदत करताना दिसतो. सोनी राजदान यांनी साकारलेली रीटाची आई कथेला भावनिक वळण देते. पण या सगळ्यांच्या मध्ये एक प्रश्न सतत डोक्यात राहतो, खरा गुन्हेगार कोण? ट्रेलरमध्ये सतत धुराच्या वलयात हरवलेली रीटा, गोळ्या घेणं, मद्यपान, तुटत चाललेलं मानसिक संतुलन… हे सगळं पाहताना ही फक्त मर्डर मिस्ट्री नव्हे, तर एका स्त्रीच्या अंतरमनाची कहाणी असल्याचं जाणवत राहतं.


दोन वर्षांनंतर करिश्माचं दमदार पुनरागमन


‘मर्डर मुबारक’नंतर जवळपास दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. ‘ब्राउन’ ही सीरिज अभीक बरुआ यांच्या ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित असून, ५ जूनपासून झी ५ (zee 5) वर स्ट्रीम होणार आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की या शहरात प्रत्येक जण काहीतरी लपवत आहे… आणि सत्य समोर आलं, तर अनेकांचे चेहरे कायमचे बदलून जाणार आहेत.
Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या