Medicines : ३० औषधांचे किरकोळ दर निश्चित, महागाईच्या काळात दिलासा

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे औषधांच्या खर्चाचा भार सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने घेतला आहे. संस्थेने ३० औषध फॉर्म्युलेशन्सच्या किरकोळ किमती निश्चित केल्या असून याचा फायदा नियमितपणे औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांना होणार आहे.




नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने ज्या औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत, त्यामध्ये व्हिटॅमिन डी-३ ओरल, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी३ आणि मेथिलकोबालामिन यांसारख्या महत्त्वाच्या औषधांचा समावेश आहे. ही औषधे हाडांची मजबुती वाढवणे, शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढणे, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या दूर करणे आणि पोषणतत्त्वांची कमतरता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.




अधिसूचनेनुसार, कॅल्शियम व व्हिटॅमिनयुक्त गोळीची किंमत प्रति गोळी १९.७८ रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर व्हिटॅमिन डी३ ओरलची किंमत प्रति मिलिलिटर १९.९१ रुपये ठरविण्यात आली आहे. याशिवाय वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांच्या किमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा विशेष फायदा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दीर्घकालीन उपचार घेणाऱ्या रुग्णांना होणार आहे. औषध कंपन्यांकडून मनमानी दर आकारण्यावरही यामुळे नियंत्रण येईल. बाजारातील पारदर्शकता वाढून रुग्णांना वाजवी दरात औषधे उपलब्ध होतील. तसेच या किमती ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर (डीपीसीओ) २०१३ अंतर्गत निश्चित करण्यात आल्या आहेत. आवश्यक औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावीत आणि आरोग्यसेवा अधिक परवडणारी व्हावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला