Ukraine's Drone Attack on Zaporizhia : झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनचा ड्रोन हल्ला; आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए ) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प (ZNPP) वर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इशारा देत म्हटले की, अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)


आयएईएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्प प्रशासनाने त्यांना ड्रोन हल्ल्याची माहिती दिली आहे. हा ड्रोन प्रकल्पातील एका टर्बाइन इमारतीवर आदळला. या धडकेमुळे इमारतीच्या भिंतीला छिद्र पडले आहे. राफेल ग्रॉसी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, कोणत्याही अणुऊर्जा केंद्रावर किंवा त्या केंद्रातून कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये. त्यांनी सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन करत अणुसुरक्षा आणि सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ न देण्याचे आवाहन केले.प्रकल्पात तैनात असलेल्या आयएईए च्या पथकाने नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी प्रभावित इमारतीपर्यंत जाण्याची परवानगी मागितली आहे. ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)



आयएईएच्या मते, एप्रिल २०२४ नंतर प्रथमच प्रकल्पाच्या संरक्षित परिसरात ड्रोन हल्ला झाला आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रांपैकी एक आहे. मार्च २०२२ पासून हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे.रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आयएईए सातत्याने लष्करी कारवायांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत इशारे देत आहे. संस्थेने वारंवार अणुऊर्जा पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)


रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉम यांनी शनिवारी सांगितले की, एका युक्रेनियन ड्रोनने या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. मात्र, मुख्य उपकरणांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. हा ड्रोन प्रकल्पाच्या युनिट ६ च्या टर्बाइन आयलंडवर आदळला आणि तेथे स्फोट झाला. या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला देण्यात आली आहे. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)



प्रकल्पाच्या सोशल मीडिया खात्यावरून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अणुऊर्जा केंद्रांवरील असे हल्ले अत्यंत बेजबाबदारपणाचे आहेत. अशा कारवायांमुळे अणुसुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. पायाभूत सुविधांवरील कोणत्याही हल्ल्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात आणि संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकतात. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)


या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठे नुकसानही झालेले नाही. रोसाटॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्सी लिखाचेव यांनी सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य उपकरणांवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला आहे. या हल्ल्यामुळे स्फोट झाला असून टर्बाइन आयलंडच्या संरचनेचे नुकसान झाले आहे. (Ukraine's Drone Attack on Zaporizhia)

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.