Nitesh Rane : अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : नितेश राणे

मुंबई : कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी झालेल्या मेळाव्यात बोलताना, अनिकेत तटकरे यांच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा असेल असे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही, कारण कोकणच्या राजकारणातील सगळेच खेळाडू या व्यासपीठावर आहेत, मग लढणार कोणाशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





महायुती एकजुटीने या निवडणुकीत उतरली आहे आणि जे मागे उरले आहेत त्यांच्यावर आम्ही आता दुर्बीण ठेवून लक्ष ठेवणार आहोत. खरंतर ही निवडणूक म्हणजे सगळा आकड्यांचा खेळ आहे. ही निवडणूक एकदिलाने लढवणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे यांनी तसे निर्देश आम्हाला दिले आहेत, त्यामुळे सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा आणि २२ जूनच्या निकालामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.



कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार आहेत आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वीही आमदार म्हणून चांगले काम केले आहे. कोकण विकासासाठी त्यांची मेहनत नेहमी असते. कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष असते, यापुढेही ते चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त ५५ मते आहेत म्हणजे चणे कुरमुरे आहेत असे मंत्री नितेश राणे म्हणाले. बाळ माने हे विरोधात का निवडणूक लढवत आहेत ? त्यांना आणि त्यांच्यासोबतच्यांना ५५ मतदार सांभाळताना त्रास होईल. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ. नेहमी निवडणूक लढायची पीएच.डी. घ्यायची नाही असा टोला मंत्री नितेश राणेंनी मारला. आजचे हे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्यामुळे फटाके घ्या असे सांगत सिंधुदुर्गमधे भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.


राणे आणि तटकरे यांची मैत्री आजसाठी आदर्श


२०१८ ला सिंधुदुर्गने अनिकेत तटकरे यांना जास्त मतदान केले होते, त्यावेळी आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार राणे यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. हे तेव्हाही स्पष्ट होते. आजच्या काळात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण