Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खोटी; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Beed : बीड जिल्ह्यातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Case) दिवसेंदिवस नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता थेट संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) 12यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात (Beed Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भातील तक्रार दादा खिंडकर याचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर याने दिली होती.


मात्र, आता धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याची दिलेली तक्रार खोटी निघाली आहे. तर समाधान खिंडकरच्या (Samadhan Khindkar) विरोधात देशमुखांनी दिलेली तक्रारही खोटी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसंच प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं आहे.



कायद्याचा गैरवापर, कठोर कायदेशीर कारवाई करणार


बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Beed Rural Police Station) हद्दीत 30 मे 2026 रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


​मस्साजोग (ता. केज ) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी समाधान खिंडकर (Samadhan Khindkar) व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबुराव खिंडकर यांनीही धनंजय देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत दुसरी तक्रार नोंदवली होती. दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपास सुरू केला.



कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या


​तपासा दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेऊन 30 मे रोजीच्या रात्री 10.05 ते 12.00 या वेळेची सखोल पडताळणी केली. या फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसून, फिर्यादींनी नमूद केलेली कथित घटना तिथे घडलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून ते 'ई-साक्ष' पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. या सर्व पुराव्यांवरून दोन्ही पक्षांनी जाणूनबुजून पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वैयक्तिक कारणावरून न्याय यंत्रणेचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण