Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली. चित्रपटांचे शो हाऊसफुल्ल होत आहेत.


'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला चिटपटगृहात रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटातून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. तो असा की, आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्याने परिस्थितीत सुधारणा करणे गरजेचे आहे. अपरंपार स्वामी भक्ती येथे चित्रपटात पाहायला मिळत आहे. ११ व्या दिवशी चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.



'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११ :


सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजेच ११ व्या दिवशी वीकेंडला २,०१५ शोजमधून ₹५.७५ कोटींचे नेट कमाई केली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. यामुळे आतापर्यंतची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ₹५१.८३ कोटी आणि एकूण नेट कमाई ₹४४.०५ कोटी रुपये इतकी झाली आहे.'देऊळ बंद २' च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.



दिवस १ - ३.०५ कोटी रुपये


दिवस २ -३.११ कोटी रुपये


दिवस ३ -५.२१ कोटी रुपये


दिवस ४ - ६. १० कोटी रुपये


दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये


दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये


दिवस ७ - ३.६० कोटी रुपये


दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये


दिवस ९ - ३.१० कोटी रुपये


दिवस १० - ५ कोटी रुपये


दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये


एकूण - ४४.०५ कोटी रुपये



'देऊळ बंद २' हा चित्रपट २०१५ साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत आणि स्नेहल तरडे महिला शेतकरीच्या भूमिकेत झळकली आहे. चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी