Gold Rate Today : सोनं-चांदी स्वस्त! जूनच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशभरातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर वाढल्याने ग्राहक आणि सराफा बाजारात मोठी चिंता व्यक्त केली जात होती. वाढलेले दर आता काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

 

बाजारातील ताज्या दरांनुसार, नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर  १५७१८०  रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १४४०९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली असून २४ कॅरेट सोन्याचा दर १५७०३० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १४४९४० रुपये इतका आहे.

 

पुणे आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १५७०३० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १४३९५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत अधिक असून २४ कॅरेट सोन्याचा दर १५९५९० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १४६२९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे.

 



गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे २०२० रुपयांची घट झाली असून २२ कॅरेट सोन्याच्या दरात १८५० रुपयांची कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतींवर दबाव असल्याचे दिसून येत आहे.

 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर मजबूत होणे, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि जागतिक घडामोडींमधील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत असल्याने बाजारात चढ-उतार सुरू आहेत.

दरम्यान, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या चांदीचा दर २७९९०० रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ५००० रुपयांची घट झाली असून त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Comments
Add Comment

1 नोव्हेंबरपासून राज्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार...

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत आहे.